इतिवृत्तांत रजिस्टर पळविले संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदेसह दोघांविरुद्ध तक्रार

Foto
 संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मासिक बैठक सुरू होताच चेअरमन तुषार शिसोदे व संचालक प्रल्हाद औटे यांनी बैठक संपली, असे सांगत हजेरी रजिस्टर तसेच इतिवृत्तांत रजिस्टर पळवून नेल्याची एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बैठक सुरू होताच चेअरमन तुषार शिसोदे व संचालक प्रल्हाद औटे यांनी बैठक संपली, असे सांगितले व हजेरी रजिस्टर तसेच इतिवृत्तांत रजिस्टर घेऊन निघून गेले. आमची कायद्यानुसार बैठकीला उपस्थिती असून देखील आमचा हक्‍क हिरावून घेतला व संस्थेच्या हितास बाधा होईल असे कृत्य शिसोदे व संचालक औटे यांनी केले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार भास्करराव किसनराव राऊत, रावसाहेब यादवराव वाघचौरे, अप्पासाहेब रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्‍वर विठ्ठलराव औटे, अण्णासाहेब शेषराव कोल्हे, प्रकाश अंबादास क्षीरसागर, शिवाजी रामभाऊ घोडके, आसाराम बाबुराव शिंदे, विजय देवराव गोरे, अहिल्याबाई झारगड या दहा संचालकांनी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker